IPL: आज (27 सप्टेंबर) न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमचा वाढदिवस आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. मॅक्युलम सध्या इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक असून त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.
ब्रेंडन मॅक्युलमचे नाव येताच त्याची स्फोटक फलंदाजी डोळ्यासमोर येते. अशा अनेक सामन्यांत ब्रेंडन मॅक्युलमने आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची धुलाई केली. अशीच एक इनिंग ब्रेंडन मॅक्क्युलमने आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात खेळली होती.
बर्याच माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा असा विश्वास आहे की ब्रेंडन मॅक्युलमच्या या खेळीमुळे आयपीएलने जबरदस्त वेग घेतला आणि नंतर ती जगातील सर्वात मोठी टी-20 लीग बनली.
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाला आणि पहिला सामना 18 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. त्यावेळी ब्रेंडन मॅक्क्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता आणि सौरव गांगुली त्या संघाचा कर्णधार होता.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मॅक्युलमने आरसीबीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि अवघ्या 73 चेंडूत नाबाद 158 धावा केल्या. मॅक्युलमने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 13 षटकार ठोकले.
त्याची ही खेळी आयपीएलच्या इतिहासातील ट्रेडमार्क खेळी होती कारण आयपीएलच्या पहिल्या सत्रातील हा पहिलाच सामना होता. त्याच्या खेळीमुळे केकेआरने निर्धारित 20 षटकात 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स संघ अवघ्या 82 धावांत गारद झाला.
ब्रेंडन मॅक्युलमच्या या धमाकेदार खेळीमुळे चाहत्यांचा आयपीएलकडे कल खूप वाढला आणि पहिल्या सत्रातच त्याला भरपूर यश मिळाले. त्यामुळेच ब्रेंडन मॅक्क्युलमची ही खेळी आयपीएलमध्ये जगातील नंबर वन टी-20 लीग बनण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
इतर बातम्या
Mahendra Singh Dhoni: धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार! चेन्नईच्या चाहत्यांनी केली खास तयारी
IPl: आधी आयपीएलचा फॉरमॅट ठरला आता मेगाऑक्शनची तारीख ठरली; वाचा कधी अन् केव्हा होणार
IPL: आयपीएलमध्ये सीएसके खेळणार मोठा डाव; ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंना घेणार संघात