T20 World Cup 2022: टीम इंडियाचा एक खेळाडू खूप चर्चेत आहे. हा खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव. मैदानात चौफेर फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातो. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, टेनिस बॉल क्रिकेट खेळून त्याने असे भन्नाट फटके खेळण्यात स्किल मिळवले आहे. हा खेळाडू सद्या वर्ल्डकप गाजवतोय.
सूर्याने झिम्बाब्वेचा गोलंदाज रिचर्ड नागरवा याला मारलेला सिक्सर हा टी-20 विश्वचषकात फेमस झाला आहे. सूर्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळताना या फटक्यावर प्रभुत्व मिळवल्याचे सांगितले. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सूर्याने अविस्मरणीय खेळी खेळली. त्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्याने भारताला 5 बाद 186 अशी भक्कम धावसंख्या उभारता आली.
डावाच्या शेवटच्या चेंडूवर मारलेला त्याचा तो षटकार सर्वोत्तम ठरला. त्याने ऑफ-स्टंपच्या पूर्ण बाहेर जात गुडघा टेकवत रिचर्ड नागरवा याला खणखणीत षटकार मारला. रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनी त्याच्या फटक्याचे कौतुक केले आहे. या सामन्यानंतर सूर्या स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हणाला, ‘त्या वेळी गोलंदाज कोणता चेंडू टाकणार आहे, हे मला आधीच माहीत असते. टेनिस बॉल क्रिकेट खेळताना मी या फटक्याचा जोरदार सराव केला होता. त्यामुळे हा फटका मारणे मला कायम सोपे जाते.
सूर्या म्हणाला, ‘त्यावेळी गोलंदाज काय विचार करत असेल हे तुम्हाला समजले पाहीजे. मी स्वतःवर विश्वास ठेवतो. बॉंड्री किती दूर आहे हे मला माहिती होते. जेव्हा मी क्रीजवर असतो तेव्हा मला वाटते की बॉंड्री फक्त 60-65 मीटर दूर आहे. मग मी चेंडूचा वेग ओळखून फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. मग मी चेंडू बॅटच्या योग्य जागेवर घेण्याचा प्रयत्न करतो आणि जर तो योग्य प्रकारे मारला गेला तर तो थेट सीमारेषेच्या बाहेर जातो.