ipl जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दिल्लीतील एका व्यक्तीने आयपीएल सामन्यांवर बंदी घालण्याचे निर्देश मागितले होते. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
गेल्या वर्षी आयपीएल 2021 कोरोना महामारीच्या दरम्यान खेळली गेली. आयपीएलची ही मालिका 2 भागात झाली. IPL 2021 ची सुरुवात भारतातच झाली होती, पण अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा UAE मध्ये खेळवली गेली.
भारतात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांदरम्यान सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सामन्यांवर बंदी घालण्याची आणि खेळाडूंचा जीव धोक्यात घालणारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
कोरोना महामारीच्या काळात इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने आयोजित करण्याचे मुद्दे असलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालय म्हणाले की, कालांतराने काही याचिका अप्रासंगिक बनल्या आहेत. सरन्यायाधीश U.U. ललित आणि न्यायमूर्ती एस.आर. भट यांच्या खंडपीठाने सांगितले की, या याचिकेवर सुनावणी करण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात 2008 साली झाली. या लीगचे आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचा १५वा सीझन याच वर्षी भारतात खेळला गेला. या लीग जगातील सर्वात मोठ्या लीग आहेत. या लीगमध्ये जगातील सर्व प्रमुख संघांचे खेळाडू सहभागी होतात.
इतर बातम्या
IPL: आयपीएलच्या ‘या’ स्टार खेळाडूला बलात्कार प्रकरणी झाली अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण
IPL: धोनी अन् रोहितमुळे नाही तर ‘या’ परदेशी खेळाडूमुळे आयपीएल बनली सर्वात मोठी लीग; नाव वाचून हैराण व्हाल