saurav ganguly big decision on ipl | जगातील प्रतिष्ठित टी २० लीग आयपीएलचा फॉरमॅट पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी फ्रँचाईझींना याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये कोविडच्या आधीचा फॉरमॅट पुन्हा येणार आहे.
२०२० मध्ये, यूएई, दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. २०२१ मध्ये, ही टी २० स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
आता कोरोना नियंत्रणात आहे आणि त्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत फ्रँचाईझींना आदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्यांनी हे म्हटले आहे.
सौरव गांगुली म्हणाले की, आयपीएल पुढील वर्षापासून घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळण्याच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाईल. सर्व १० संघ आपापल्या घरच्या मैदानावर सामने खेळतील. २०२० नंतर प्रथमच बीसीसीआय संपुर्ण देशात आयपीएलचे आयोजन करत आहे.
तसेच बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएल पुढील वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्याची योजना आखत आहे. या संदर्भात, पीटीआयने गेल्या महिन्यात वृत्त दिले होते की, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी २० वर्ल्डकपनंतर मार्चमध्ये महिला आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते.
सौरव गांगुली यांनी २० सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बीसीसीआय सध्या बहुप्रतिक्षित महिला आयपीएल आयोजित करण्यावर काम करत आहे. त्यांचा पहिला सिजन पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. महिलांच्या आयपीएल व्यतिरिक्त बीसीसीआय १५ वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा देखील आयोजित करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Bhuvneshwar Kumar : त्याला संघातून काढा म्हणणाऱ्यांवर भडकली भुवनेश्वरची बायको; म्हणाली, ते रिकामटेकडे…
Ashish Nehra : उमेश यादवला संघात स्थान दिल्यामुळे भडकला आशिष नेहरा; म्हणाला, त्याच्याऐवजी…
T20 World Cup : फिनिशर सुद्धा आणि ओपनर सुद्धा, भारताकडे आहे हा खतरनाक खेळाडू; तरीही वर्ल्डकपसाठी वगळले