महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश (MAH vs UP) यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी 2022 चा उपांत्यपूर्व सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. रुतुराज गायकवाडच्या 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने हा सामना 58 धावांनी जिंकला.
त्याचवेळी गायकवाडला त्याच्या द्विशतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, मात्र यादरम्यान त्याने औदार्य दाखवून मने जिंकली. ऋतुराजने स्वत: नव्हे तर राजवर्धन हंगरगेकर हा खेळाडू त्याच्या चमकदार कामगिरीसाठी खऱ्या अर्थाने सामना पुरस्कारास पात्र असल्याचे म्हटले आणि त्याच्याकडे पुरस्कार सोपवला.
आज भारतात कोणत्याही खेळाडूची चर्चा होत असेल तर ती म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या रुतुराज गायकवाडची. ज्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 220 धावांची तुफानी खेळी केली, त्याच्या खेळीत 16 षटकार आणि 10 चौकार होते.
हा सामना 58 धावांनी जिंकल्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, परंतु यावेळी 5 विकेट्स घेणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरला पुरस्काराचे खरे मानकरी म्हटले.
सामनावीर ठरल्यानंतर रुतुराज गायकवाडने राजवर्धन हंगरगेकरला बोलावून सादरकर्त्याला विनंती केली की राजवर्धन हंगरगेकर त्याच्या शानदार स्पेलसाठी तो सामनावीर पुरस्कारास पात्र आहे.
विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथम फलंदाजी केल्यानंतर त्याने गोलंदाजीत आपली चुणूक दाखवली. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी चमकदार गोलंदाजी करताना उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले. त्यांना खुलून फलंदाजी करण्याची संधीच दिली नाही.
दुसरीकडे राजवर्धन हंगरगेकर या सामन्यात 10 षटकात 53 धावा देत 5 महत्त्वाच्या विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात पाच विकेट घेत उत्तर प्रदेशचे कंबरडे मोडले.
ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि 16 षटकार मारले. त्याने एकाच षटकात 7 षटकारांसह 43 धावा कुटल्या. एकाच षटकात ७ षटकार मारणारा तो जगातील पहीला फलंदाज ठरला.
त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्र संघाने 5 गडी गमावून 330 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील शेवटच्या 8 डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग होता. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वे शतक आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील 49 वे षटक टाकत होता. त्याला ऋतुराजने सलग ४ षटकार मारले होते. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंवरही ऋतुराजने षटकार खेचला. अशाप्रकारे, त्याने एका षटकात 7 षटकार आणि एका नो चेंडूसह एकूण 43 धावा केल्या.