Ruturaj Gaikwad: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एलिट ग्रुप सी मध्ये महाराष्ट्र आणि केरळ यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या एका स्टार खेळाडूने आपली छाप सोडली आहे. एवढेच नाही तर या ट्रॉफीतील त्याचे हे दुसरे शतक आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत कर्णधार धवनने या खेळाडूकडे दुर्लक्ष केले. पण आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये या फलंदाजाची बॅट तुफान चालत आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. देशांतर्गत लीगमध्ये महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने आपले दुसरे शतक झळकावले आहे. केरळविरुद्ध खेळताना त्याने 68 चेंडूत 114 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. इतकंच नाही तर पवन शहासोबत सलामीची फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारीही केली.
ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड झाली असली तरी त्याला फारशी संधी दिली जात नाही. संधीअभावी गेल्या काही काळापासून देशांतर्गत मालिकेत ऋतुराज गायकवाडच्या आत धावांची भूक दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र कर्णधार धवनने त्याला एकाच सामन्यात खेळण्याची संधी दिली.
ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसतो. आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना त्याने 1 शतक झळकावले आहे. मात्र या काळात त्याने आपल्या करिअरची चांगली सुरुवातही केली आहे. 2021 मध्ये चेन्नईकडून खेळताना त्याने सुमारे 600 धावा केल्या होत्या.
दरम्यान, आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे त्याचा राष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु येथे तो फार चांगली कामगिरी करू शकला नाही. ऋतुराज गायकवाडला भारतासाठी सलग सामने खेळता आलेले नसले तरी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
इतर बातम्या
Team India : तीच जर्सी, तोच कोच, तोच दरारा..टिम इंडीयात आलाय प्रतिस्पर्ध्यांच्या चिंधड्या उडवणारा नवा युवराज
Ruturaj Gaikwad: आफ्रिकेविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या ऋतुराजने दाखवली आपली ताकद, मुश्ताक अली ट्रॉफीत ठोकले शतक
Arjun Tendulkar: मुंबईने संधी नाही तर अर्जुन तेंडूलकरने दाखवली आपली ताकद; मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केली ‘ही’ मोठी कामगिरी