Team Pakistan: पाकिस्तान संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक याने आपल्याच संघातील खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याच देशातील लोकांच्या निशाण्यावर राहिला आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडविरुद्ध झेल सोडले आणि मिस फिल्डिंग करतानाही दिसले. त्यामुळे मिस्बाहने खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिसबाह उल हक आणि वसीम अक्रम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे दोन्ही दिग्गज संघाच्या फिटनेस संस्कृतीवर चर्चा करत आहेत. ज्यामध्ये हे दोन्ही खेळाडू पाक क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर जोरदार टीका करत आहेत.
यादरम्यान अँकरने मिसबाहला विचारले की, तू संघ सोडल्यापासून संघाच्या फिटनेसमध्ये काय बदल झाला आहे? यावर उत्तर देताना मिसबाह म्हणतो, “पाकिस्तानमध्ये खेळाडूंना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाण्यास भाग पाडणाऱ्याच्या बाबतीत असंच घडतं. शोएब मलिक होता, युनूस खान होता, मी होतो. आम्ही स्वतःला पुश करत राहायचो. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही त्यांच्या लिमीटच्या पुढे पुश केले तर तुम्ही चांगले प्रशिक्षक नाही. म्हणूनच तुम्ही वाईट बनता.
तसेच पुढे बोलताना मिसबाह म्हणतो की, जेव्हा तुम्ही फिटनेसबाबतच्या गोष्टी पाकिस्तानी खेळाडूंवर सोडता तेव्हा तुम्ही त्यांचे सुटलेले पोट पाहू शकता. त्यांना मुव करता येत नाही, हे तुम्ही पाहिलंच असेल. दरम्यान, पाकिस्तानच्या संघात असे अनेक खेळाडू पाहायला मिळाले आहेत.
शिवाय मिसबाहने असाही खुलासा केली की, “गेल्या एका वर्षात, माझ्या माहितीनुसार पाकिस्तानी संघात एकही बेंच मार्क नाही, फिटनेस चाचणी नाही. कोणतीही चाचणी नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जे आहे ते विनोदी आहे. त्यावेळी आम्ही वादही घालायचो. कारण पाकिस्तानी संघाचा दर्जा देशांतर्गतही असला पाहिजे असे आम्ही म्हणायचो पण हे लोक आमच्या विरोधात जायचे.
इतर बातम्या
Babar Azam: VIDEO: टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची उडवली झोप, नेटमध्ये कसून सराव करताना दिसला बाबर आझम
Virat Kohli: इतिहासाची होणार पुनरावृत्ती, कोहलीने पाकिस्तानी अँकरसोबत काढला फोटो, ‘बॅड लक झालं सुरू’
Team India: वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यासाठीचा भारतीय संघ ठरला, ‘हे’ ११ घातक खेळाडू लावणार पाकिस्तानची वाट