IPl: आयपीएल 2023 पूर्वी ऑक्शनची तारीख समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 16 डिसेंबरला होऊ शकतो. फ्रँचायझींमध्ये तात्पुरत्या वेळापत्रकावरही चर्चा झाली आहे. दरम्यान, नुकतीच BCCI/IPL अधिकार्यांकडून यासंदर्भात सूचना मिळाल्या आहेत.
यावेळी लिलाव हा मिनी लिलाव असेल. मात्र, ते कुठे आयोजित केले जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव बेंगळुरू येथे झाला. त्याच वेळी, आयपीएलचा पुढील हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकतो आणि यावेळी होम आणि अवे मॅचेसचे स्वरूप असेल.
प्रत्येक संघ किमान 5 कोटी राखीव रकमेसह लिलाव सुरू करेल. कारण सैलरी पर्स 95 कोटी झाली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा 5 कोटींनी जास्त आहे. जर एखाद्या फ्रँचायझीने आपल्या खेळाडूंचा व्यापार केला किंवा सोडला तर पर्स शिल्लक आणखी मोठी असू शकते.
गुरुवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पुष्टी केली की पुढील हंगामातील आयपीएल जुन्या फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल. याचा अर्थ असा की सर्व दहा संघांना त्यांचे अर्धे सामने घरच्या मैदानावर आणि अर्धे सामने विरोधी टीमच्या मैदानात खेळावे लागतील, जसे की आयपीएल 2020 पूर्वी होते.
आयपीएल 2020 मध्ये कोरोनामुळे यूएईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर 2021 मध्ये पहिला टप्पा भारतात आणि दुसरा टप्पा UAE मध्ये झाला. आयपीएल 2022 भारतात आयोजित करण्यात आले होते परंतु केवळ काही ठिकाणीच आयोजन करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, आता आयपीएल 2023 चे सामने पूर्वीप्रमाणेच्या आयपीएल फॉर्मेटमध्ये होणार आहेत. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळेल. त्यामुळे यंदाची स्पर्धा भारतात होईल हे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
IPL: आयपीएलमध्ये सीएसके खेळणार मोठा डाव; ‘या’ ३ दिग्गज खेळाडूंना घेणार संघात
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदावर ‘या’ दिग्गज खेळाडूची नियुक्ती, पुढच्या आयपीएलमध्ये करणार राडा
IPL : एकेकाळी आयपीएल गाजवणारा ‘हा’ खेळाडू घेतोय निवृत्ती; नाव वाचून तुम्हाला बसेल धक्का