Gambhir: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने वर्ल्डकपच्या मोहिमेची सुरुवात करेल. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ सराव सामना खेळत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणार्या गौतम गंभीरने विराट कोहलीबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटले आहे की, फलंदाजाचे काम धावा करणे आणि गोलंदाजाचे काम विकेट घेणे आहे. अशा स्थितीत विराटप्रमाणेच सर्व फलंदाज या मानसिकतेने टी-२० विश्वचषकात उतरतील. विराट कोहलीने फक्त धावा करण्याचा विचार करावा, रेकॉर्ड बनवण्याचा किंवा तोडण्याच विचार करू नये.
भारत-पाक सामन्यापूर्वी गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला, ‘धावा काढण्याच्या मानसिकतेशिवाय फलंदाजाला इतर कशाचीही गरज नसते. फलंदाजाचे काम धावा काढणे, तर गोलंदाजाचे काम विकेट घेणे. धावा काढणे म्हणजे ज्यामुळे तुमचा संघ जिंकतो. अशा धावा नाही ज्या तुमच्या रेकॉर्डवर जातात. तुम्ही 40 किंवा 30 स्कोअर करा परंतु तुमचा संघ 170/180 पर्यंत पोहोचू शकतो असा विचार करून करा. जर तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करत असाल तर अशा धावा करा ज्यामुळे खालच्या मधल्या फळीवरील दबाव कमी होईल.
तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही अशा सर्व स्पर्धांना जाता तेव्हा वैयक्तिक रेकॉर्ड घरी ठेवले पाहिजेत. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला जात असाल तर तुम्ही भारताचा विचार केला पाहिजे कारण या स्पर्धेत वैयक्तिक विक्रमाला काहीच किंमत नाही. विश्वचषक जिंकण्यात महत्त्व आहे. जर संघ जिंकला तर तो तुमचा अभिमान आहे.
गंभीर असंही म्हणाला की, जर तुम्ही 500 धावा केल्या आणि संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर त्या धावा फक्त तुमच्या रेकॉर्डमध्ये जमा होतात. बाकी टीका संपूर्ण संघाला सहन करावी लागते. दरम्यान, गंभीरचं हे विधान विराट कोहलीला उद्देशून असल्याचं बोललं जातंय.
इतर बातम्या
Gautam Gambhir: गौतम गंभीर घेणार आता भारतीय संघाने अनेक निर्णय, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी
Virat Kohli: इतिहासाची होणार पुनरावृत्ती, कोहलीने पाकिस्तानी अँकरसोबत काढला फोटो, ‘बॅड लक झालं सुरू’
Virat Kohli : केएल राहूलमध्ये विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता; गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य