T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाच्या कर्णधाराचे नाव निश्चित झाले आहे. आता ही जबाबदारी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सांभाळणार आहे. अॅरॉन फिंचने नुकतीच ५० षटकांच्या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात संघाला पुन्हा चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी कमिन्सवर असेल.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपदही पॅट कमिन्सकडे आहे. अशा परिस्थितीत तो दोन फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनला आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा २७ वा वनडे कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसेल. स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.
अॅरॉन फिंच वनडे फॉरमॅटमधून निवृत्त झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे कर्णधारपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, संघाच्या कर्णधारपदावरील आजीवन बंदी कायम असल्याने वॉर्नर या शर्यतीतून बाहेर पडला. त्याच्याकडे कमांड सोपवायचे असेल तर, बोर्डाला आधी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करावा लागेल. वॉर्नर आणि स्मिथ दोघेही 2018 मध्ये बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळले होते. त्यामुळे या दोन्ही क्रिकेटपटूंवर प्रत्येकी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
ऑस्ट्रेलिया निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली म्हणाले, ‘पॅट कमिन्सने कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अॅशेस मालिकेपूर्वी कमिन्सकडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. कमिन्सने आत्तापर्यंत 9 कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 5 सामने जिंकले, एक पराभूत आणि तीन अनिर्णित राहिले.
कर्णधारपद मिळाल्यानंतर कमिन्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळताना मला खूप आनंद झाला. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली मला खूप काही शिकायला मिळाले. त्याची भरपाई करणे सोपे काम होणार नाही. मात्र, आमचा एकदिवसीय संघ भरपूर अनुभवी आहे त्यामुळे मी खूप खूश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Team India: वर्ल्डकपआधीच टीम इंडियात झाला मोठा बदल; रोहितऐवजी ‘हा’ स्टार खेळाडू झाला कॅप्टन
T20 World Cup: मोदींमुळेच नामिबिया जिंकला; वर्ल्डकपमध्ये झालेल्या विजयानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
New Zealand Team: न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडूने वर्ल्डकपच्या आधीच सोडला संघ; खेळणार ‘या’ देशाकडून